Friday, 14 September 2012

तू

                                          तू

तू , दूर असूनही वाटतेस माझ्या समीप आहेस तू ...

तू, सगळ असूनही वाटतेस जीवनातली एकच उणीव आहेस तू ...

तू ... भासतेस अंधारया रात्री पडलेली सुखद चंद्र छाया तू ..

तू , ..कुशीत जावून भेटणारी एकच माया तू..

तू,.. प्रीतीच्या उतारावरून   खळाळून पडणार एकच हास्य तू ..

तू,.. आयुष्यात हवस वाटलेलं एकच दास्य तू ..

तू.. मनात फुललेल एकच इंद्रधनू तू ..

तू,.. सदा सर्वदा एकच ध्यास मनी तू .

तू..

तू.. माझ्या हृदयात धडादलेल एकच स्पंदन तू ..

तू, माझ्या मनाला असलेल  एकच बंधन तू ..

तू..,

-- प्रवीण

No comments:

Post a Comment