Sunday, 10 February 2013

कोण आहेस तू ?

                                कोण आहेस तू ?

आजूबाजूच्या हवेला आज कोणाचा स्पर्श झाला..
उदास मनाला आज का हर्ष झाला ?

कितीतरी दिवसांनी तेच निखळ हास्य कानी आले..
तुला पाहून किती विचार आज मनी आले...

आजही का मनाची आस आहेस तू ?
सत्य आहेस कि मला झालेला भास आहेस तू ?

तू तीच असूनही माझ्यासाठी ती नाहीस तू ...
कधी कळेल का माझ्यासाठी कोण आहेस तू ?

माझ्यासाठी आहे तुझ्या मुखावर हसू
तर का त्या सुंदर डोळ्यात आहेत ते आसू ?

जवळच असूनही कितीतरी दूर आहेस तू
कितीतरी सांगता सांगता .. काही जवळच ठेवत आहेस तू ..

अंधाऱ्या रात्रीही पुनवेच्या  चंद्राची  चांदणी  आहेस तू ..
स्वर्गातल्या इंद्राची अप्सरा आहेस तू ..

तू तीच असूनही माझ्यासाठी ती नाहीस तू ...
कधी कळेल का माझ्यासाठी कोण आहेस तू ?


-- प्रवीण

1 comment:

  1. जबरदस्त ... Professional कवी झाला आहेस पव्या तू
    Keep Writing

    ReplyDelete