Sunday, 19 May 2013

कधी कधी एक मुलगी वेड्या सारखी वागते

                                       कधी कधी   एक मुलगी  वेड्या सारखी वागते

कधी हसते , कधी रडते  ,
कधी कधी एक मुलगी  वेड्या सारखी वागते ..

वेळाने गेलो तर रुसून बसते ..
मग समजवायला गेलो तर रागाने पाहते ....
हिरमुसून मग बसायला जाव तर .. गालात खुदकन हसते ..
कधी कधी एक मुलगी वेड्या सारखी वागते ..

छोट्या छोट्या गोष्टींवर मनापासून हसते ...
आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट हि करते ..
कॅडबरी च्या आमिषावर मानून हि जाते ..

कधी हसते , कधी रडते  ,
कधी कधी एक मुलगी  वेड्या सारखी वागते ..

निरोप  मग वळून वळून पाहते ...
वाटणारे प्रेम डोळ्यातून ओघळते ..
कधी कधी एक मुलगी  वेड्या सारखी वागते ..


--प्रवीण


No comments:

Post a Comment