Tuesday 6 December 2011

जीवनगाणे

जीवनगाणे
स्वप्नातील सखे येतू माझ्या सवे ..
पाहुनी अन तुला घडते गाणे नवे ..
अंतरीच्या मना छेड तराणे नवे ..

मंद झंकार तू ..
दीर्घ ओंकार तू ..

ऐकुनी हि व्यथा येतू माझ्या कवे..
अंतरीच्या मना छेड तराणे नवे ..

ओठांवरचा नकार तू ..
मेनकेचा आकार तू ..

सखे तुझ्यापुढे किती वेडावली मने ..
अंतरीच्या मना छेड तराणे नवे ..

मनातला एकच नाद तू ..
माझ्या कवितेला मिळालेली एकच दाद तू ..

तुझे माझे प्रिये असे हे नाते जुने ..
अंतरीच्या मना छेड तराणे नवे ..

-प्रवीण


Friday 19 August 2011

वेड मन आणि तुझी आठवण


कधीतरी सायंकाळी तुझी आठवण येते
तू जवळ नसल्याची जाणीव ठेवून जाते
भिरभिरत्या मनाला मग संध्याकाळचा साज चढतो ...
तुझ साठी रात्रीलाही जागण्याचा मग नाद जडतो ...
किनार्यावरल्या वाळूत वेड मन चालत राहत
तुझ माझ नाव प्रत्येक लाटेत शोधून पाहत...
क्षितीज्यापलीकडे सूर्यही मग जातो पाठ फिरवून ..
पक्षांचा थवा उडत राहतो मनाला अस्वथ करवून ..
एकट्या मनाची मग मित्रांशी गाठ पडते ..
बोलता बोलता नवीन उमेदेची मग बात घडते ..
झोपी जाताना डोळ्यातला तुझा चेहरा मंद हसत राहतो
माझ्या डोळ्यातले तुझे प्रतिबिंब अलगत वेचून राहतो ..
एखाद्या सायंकाळी तुझ्यामुळे मन व्याकूळ होत
आठवणीचे सारेच क्षण मनात उमलून बकुल होत ..
तुझ्यामुळे आजकाल माझ अस होत
तुझी आठवण येते आणि मन पीस होत ......
-- प्रवीण

Friday 22 July 2011

तुझ नसण...

गालावरची खळी अन तुझ ते लोभस हसण..

पहाटे पहाटे डोळ्यासमोर दिसण..

पाहताच मग हृदयात जावून बसन ...

प्रत्येक क्षणी तुझ मला पूरक असण......



मग अधून मधून माझ्यावर रुसन ..

माझ्यापासून दूर जावून बसण..

तरीही माझ्या एक झलकेसाठी वारंवार एकच खिडकी पुसण ..



आवडत नसूनही माझ्यासाठी तोच निळा ड्रेस नेसन ..

मिठीत येवून मग सगळ्या जगाला विसरण..

माझ परत मग तुझ्या हर एक अदेला फसण ..

आणि काळ वेळेची सगळीच बंधन पुसण ..



जाताना निरोप देन आणून अवसान उसण..

डोळ्यातले दोन थेंब अलगत ओघळण..

डोळ्यातून थेट काळजात घुसन ...

कायम टोचत राहत तुझ इथे नसण ...



- प्रवीण

Friday 17 June 2011

प्रेमाचे खूळ

प्रेमाचे खूळ
अग ये ना
जवळ घे ना ..
करूया प्रेमात छोटीसी भूल भूल भूल .....
तुझ्या नि माझ्या प्रीतीच्या वेलीवर फुललंय प्रेमाच फुल फुल फुल ......

अग ये ना
जवळ घे ना ..........


तुझ्या ग प्रेमात झालो मी दिवाना ..
कुठे ग शोधू सापडे तू कुठेना ....
दिलावर माझ्या चाले तुझेच रूल रूल रूल ..

अग ये ना
जवळ घे ना ..
करूया प्रेमात छोटीसी भूल भूल भूल .....

सोडून दे आता तुझा हा बाणा ..
आठव आपल्या प्रेमाच्या आणा..
तुझा न माझा दोघांचा जोडा, दिसतो खरच कुल कुल कुल ..


अग ये ना
जवळ घे ना ..
करूया प्रेमात छोटीसी भूल भूल भूल .....

तुझ्याच प्रेमात , अग हे मीना
खर मी झालो पक्का कमिना..
डोक्यात चढले .. , कसले हे प्रेमाचे खूळ खूळ खूळ.. ...

अग ये ना
जवळ घे ना ..
करूया प्रेमात छोटीसी भूल भूल भूल .....

-प्रवीण

Saturday 11 June 2011

तिथे मी नसणार

तिथे मी नसणार
परतीच्या वाटेवर नभ ढगांनी दाटलेलं
त्यातच मला जुन्या सावल्यांनी वेढलेलं..

कधीतरी तुला लोक माहेरी पाठवणार ..
त्याच मळलेल्या वाटेवर तुला पुन्हा सारे काही आठवणार ..
जुन्या स्मृतींचे क्षण तू पुन्हा मनात साठवणार ....

आठवून मग मनाचे गुपित तू मनालाच सांगणार ...
डोळ्यात मग तुझ्या माझ्या सहवासाचे सारेच पावसाळे दाटणार ...
ह्र्य्दायात मग एकच शल्य टोचणार . तिथे मात्र मी नसणार ....

(मग तुला सार काही आठवेल)
आठवून बघ .. जिथून फोन करायाशीच ते दुकान ..
आपल्या नेहमीच्या भेटण्याचे ठिकाण ..
गुलाबात डोलणार तुझ्या माझ्या प्रेमाच निशाण ..

सार आठवून मग स्वतःशीच भांडणार ....
माझ्या वाटेवर मग डोळे लावून बसणार ....
तुझ्या माझ्या प्रेमात .. तिथे मी मात्र कुठेच नसणार ..

-प्रवीण

Monday 30 May 2011

ब्लैंक कॉल

ब्लैंक कॉल
आजकाल रात्री अपरात्री एखादा ब्लैंक कॉल येतो ..
आणि मनात असंख्य विचारांचे वादळ ठेवून जातो ..

फोन उचलावा कि नाही कळत नाही ..
पलीकडून शांतातेशिवाय कोणीच बोलत नाही ..

(म्हणाली होतीस )
तू न बोलताच मला सगळ कळत.
त्याचा असा उपयोग करशील ,कधीच वाटल नव्हत .

मग तुझ्या स्वाशांचा आवाज मी ऐकत राहतो ..
न बोलताही खूप काही बोलत राहतो ..

मग तो अबोलाही ओळखीचा वाटतो ..
मनात मग आठवणीचा कल्लोळ माजतो ..

नंतर मग मोडत वेळेच घरट..
टपोऱ्या डोळ्यातून मग पाणी वाहत .

रोजच्या सारखा मग हा हि कॉल संपतो
बाय म्हणताना मात्र तुझा आवाज कम्पतो ..

वेळी अवेळी कधी तरी फोन वाजतो ...
आजकाल ब्लैंक कॉल हि हवाहवासा वाटतो ..

Friday 27 May 2011

कटिंग चाय

कटिंग चाय
आला समोरून मुलींचा घोळका ..
त्यातून आपलासा चेहरा निरखून ओळखा..

लोभस डोळे अन त्वचा जणू दुधावरची साय ..
सुरेल गळा अन कातील पाय ..
मौडर्ण फैशन अन पायात हिल्स आहेत हाय ..
जोडीला आहे जिवलग मित्र आणि कटिंग चाय .....

पाहताच मग नजरेचा खेळ होतो सुरु ..
कोणाला पाहू आणि कोणासाठी झुरू ..

अदा पाहून होतो कलेजा खल्लास भाई ..
कुणाची catagory आपली , तर कुणी standard हाय ..
इथे सुंदर बालांचा तर वान्दाच नाय ..
जोडीला आहे जिवलग मित्र आणि कटिंग चाय .....


-प्रवीण

Tuesday 17 May 2011

स्वप्नातील अप्सरा

स्वप्नातील अप्सरा
पाहताच तुझला चित्त हरपले ..
स्वप्नात मी आज कोणं पाहीले?

नितळ काय अन चंदेरी चेहरा ..
जणू चंद्राची छाया अन चांदण्याचा पेहरा ..
पाहताच तुझला भानही हरपले ..
स्वप्नात मी आज कोण पाहीले?

मुख आरस्पानी त्यावर मृग लोचन
तूच सौंदर्य देवता तूच प्रेम मोचन ...
पाहताच तुझला मनही गुंगले ..
स्वप्नात मी आज कोण पाहीले?

जात्याच सौंदर्यावर गळा कर्ण मधुर ..
तुझ्यासमोर तर कोकीलाही वाटते कठोर ..
तुला पाहून मग स्वप्नही धन्य जाहले ,,,,
स्वप्नात मी आज कोण पाहिले ?

-प्रवीण

Wednesday 13 April 2011

प्रेमाचा विकार

प्रेमाचा विकार
तारुण्याच्या लाटेवर होवून स्वार,
बांधा कमनीय शेलाटी नार ,
असे मृगनयन डोळे पाणीदार ,
ओठ गुलाबी , मान सुरायीदार ,
गाल चंदेरी कुरळा केशसंभार ...

३६-२४-२६ चा शिरीराचा आकार ,
कोण्या कवीच्या प्रेमाचा हुंकार ...
भक्ताच्या मनातला देवाचा ओंकार ,
बन माझ्या जीवनाचा आधार ,


पोरी नको करू दिलाला बेजार ,
चाल ठुमकत वाकू नको फार ,
भेटशील का एकांतात एकवार ..
सांग आणू bike कि मेर्सिदेस कार ..

असे नाही म्हणणार कितीवार ,
ठरवू भेटायची वेळ रविवार दुपारचे चार ,
भेटून गिरवू प्रेमाचे सगळे प्रकार ,
नाही म्हणून देवू नको माझ्या हृदयाला विकार .

सोडून दे जगाचे बंधन आणि शिष्टाचार ,
कशाला पाहिजे पैसे आणि त्याचा गुणाकार ,
मीच तुझा इंग्लंडचा राजा आणि रशिअन झार ,
माझी तू अर्धागिनी आणि मी तुझा भ्रतार ,
दोघे मिळून करूया प्रेमाचे स्वप्न साकार ..


भेटली होती अशी एक ,
तारुण्याच्या लाटेवर होवून स्वार,
बांधा कमनीय शेलाटी नार ,


-प्रवीण

Saturday 9 April 2011

सांजवेळेची आठवण

सांजवेळेची आठवण

फुलपाखराप्रमाणे दिन उडून जातात अस म्हटलंय कोणी ,
जाणारया प्रत्येक दिवसाबरोबर धूसर होतायेत तुझ्या आठवणी ..

अजूनही मनात ताजी आहे ती मिठी आणि कानामागाचे उष्ण श्वाश ,
अजूनही उरात भरून उरलाय रातराणीचा तो सुवास ....

दिवस निघून जातो , पण सांज मात्र रेंगाळते ..
आठवणीचे प्रत्येक क्षण इंद्रधनू होऊन ओघळते ...

सांजवेळी , तुझ्या आठवणीने शांत होत , दिवसभर भिरभिरणारे मन ..
आणि आठवत नाही , तुला न आठवणारा एकही क्षण ..

सांज वेळ जावून मग रात्रीशी भेट घडते ..
स्वप्नात येते तेच आंगण आणि तू बांधलेले दोघांचे घरटे ..

तुझ्याच आठवणीत रात्रभर जागा राहतो ..
मग पहाटेचा सूर्यच माझ्याकडे हसून पाहतो ..

समोर असतो अंगणात पडलेला मोगऱ्या बरोबरोबाराचा आठवणीचा सडा ...
कुठे तरी दूर कोकिला गात असते ,तूच शिकवलेला प्रेमाचा पाढा ..

आशा करतो नव्या जीवनात सुखी असशील ,
पण मन म्हणत मनातून दुखी असशील ..

आजकाल , दिवस निघून जातो , आणि मग सांज पुढे येते ,
आणि मग तुझ्या आठवणीने मन मात्र वेडे होते...

साद देते , किनाऱ्यावरची सांज वेळ आणि मंद हवा ,
रोजच्या प्रमाणे चालू होतो मग प्रेमाचा अध्याय नवा ..

कधीतरी वेळ जातो मित्रांबरोबर छान,
आता पत्यात हि मिळत नाही बदामाचे पान..

आजकाल , दिवस आणि रात्रीशी बसत नाही मेळ,
प्रेमाच्या गावी घेवून जाते , तुझी आठवण आणि सांज वेळ .....

- प्रवीण

Thursday 7 April 2011

पहिला पाऊस आणि पहिले प्रेम

पहिला पाऊस आणि पहिले प्रेम
पहिला पाऊस पहिले प्रेम ,
पहिल्या सरीचे पहिले थेंब ..

मुसळधार धारा आणि कोसळणारा पाऊस ..
त्यात भिजण्याची त्याची हौस ...

(तिला पाऊस आवडत नाही .. पण त्याला पाऊस आवडतो..तीचे आणि त्याचे संभाषण खाली)
पाऊस म्हणजे चिखल , पाऊस म्हणजे ओली माती.
सखे ह्या पावसातच जुळतात जन्मा-जन्माच्या गाठी ,

पाऊस म्हणजे वाफाळलेला चहा , पाऊस म्हणजे गरम कांदा भजी...
राणी ह्यांच्या प्रमाणेच असुदे प्रीत तुझी अन माझी...

पाऊस म्हणजे थंडगार वारा , पाऊस म्हणजे सर्दी ..
पाऊस म्हणजे प्रेमाच्या धारा , पाऊस म्हणजे प्रेमाची वर्दी ..

(ती चिडते आणि म्हणते )
माझ्या आणि पावसा मध्ये कोणाला पसंत करशील ,
सखे वाटलं नव्हत ,अस विचारून माझ्या हृदयाची शकल करशील ..

मला तर पाऊसच प्रिय वाटतो ..
आणि त्याच्या थेंबा मधून तुझाच चेहरा वाहतो ..

कापसाच्या पिंजर्यातला काळाकुट ढग ..
तुझ्या गोऱ्या गालावरची जणू केसांची बट..

पावसानी भरलेले नभ ओले ओले ,
माझ्याच प्रतीबिम्बात बुडलेले तुझे निळेशार डोळे

.कुठूनशी येणारी कडाडणारी वीज ,
पण तुझ्या स्मित हास्याचे तिला नाही चीज .

म्हणूनच म्हणतो , तुझ्या पेक्षा पाऊस मला प्रिय वाटतो ,
आणि त्याला पाहिल्यावर मला तुझाच चेहरा स्मरतो ..

चल सोडून सारी लाज ,
दुनियेचा राखू नको बाज ,
कशाला काम आणि कशाला काज ..
चल पावसात बेभान नाचूया आज ..

नको .. मला पावसाची भीती वाटते .
.कडाडणारी वीज किती खरी वाटते ..

चल भिवू नको...बाहेर मी पावसालाच भिजताना पाहिलाय ..
आपल्या सारखीच तोही छत्री विसरलाय ....

म्हणूनच पाऊस मला तुझ्याहून प्रिय वाटतो ..
त्याला पाहिल्यावर , त्यात मला तुझाच चेहरा स्मरतो...

चल मनातल्या मनात माझ्या , आठवणीच्या गावी जावू ..
आणि तुझे माझे सारेच पावसाळे परत भिजून पाहू...

पाऊस आल्यावर एखादी अशी कविता स्मरते ..
आणि जगण्याला तुझी एकच आठवण पुरते ..

-प्रवीण