Sunday 19 May 2013

कधी कधी एक मुलगी वेड्या सारखी वागते

                                       कधी कधी   एक मुलगी  वेड्या सारखी वागते

कधी हसते , कधी रडते  ,
कधी कधी एक मुलगी  वेड्या सारखी वागते ..

वेळाने गेलो तर रुसून बसते ..
मग समजवायला गेलो तर रागाने पाहते ....
हिरमुसून मग बसायला जाव तर .. गालात खुदकन हसते ..
कधी कधी एक मुलगी वेड्या सारखी वागते ..

छोट्या छोट्या गोष्टींवर मनापासून हसते ...
आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट हि करते ..
कॅडबरी च्या आमिषावर मानून हि जाते ..

कधी हसते , कधी रडते  ,
कधी कधी एक मुलगी  वेड्या सारखी वागते ..

निरोप  मग वळून वळून पाहते ...
वाटणारे प्रेम डोळ्यातून ओघळते ..
कधी कधी एक मुलगी  वेड्या सारखी वागते ..


--प्रवीण


Sunday 10 February 2013

कोण आहेस तू ?

                                कोण आहेस तू ?

आजूबाजूच्या हवेला आज कोणाचा स्पर्श झाला..
उदास मनाला आज का हर्ष झाला ?

कितीतरी दिवसांनी तेच निखळ हास्य कानी आले..
तुला पाहून किती विचार आज मनी आले...

आजही का मनाची आस आहेस तू ?
सत्य आहेस कि मला झालेला भास आहेस तू ?

तू तीच असूनही माझ्यासाठी ती नाहीस तू ...
कधी कळेल का माझ्यासाठी कोण आहेस तू ?

माझ्यासाठी आहे तुझ्या मुखावर हसू
तर का त्या सुंदर डोळ्यात आहेत ते आसू ?

जवळच असूनही कितीतरी दूर आहेस तू
कितीतरी सांगता सांगता .. काही जवळच ठेवत आहेस तू ..

अंधाऱ्या रात्रीही पुनवेच्या  चंद्राची  चांदणी  आहेस तू ..
स्वर्गातल्या इंद्राची अप्सरा आहेस तू ..

तू तीच असूनही माझ्यासाठी ती नाहीस तू ...
कधी कळेल का माझ्यासाठी कोण आहेस तू ?


-- प्रवीण

कधीतरी वेड्यागत वागायच असत

(ऑफिस मधून येताना माला सुचलेली उस्फुर्त कविता
words are mine but inspired by संदीप खरे )

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,

प्रेमात पडून छान लव letter लिहायच असत ,
आणि तेच परत , आणि तेच परत ,
करण्यासाठी better मित्राला वाचायला दयायच असत ,

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,

आपल्या प्रेमालाही प्रीति म्हनायच असत ,
आणि भीती वाटत असुनही प्रेमात कवी व्ह्यायच असत

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,

क्लास मधून बाहेर काढल्यावर . क्लास मधून बाहेर काढल्यावर .
कॉलेज मधे बरोबर नहीं सिस्टम म्हनायच असत ,
आणि मिताची assignment घेवुन तिलाच कस्टम करायच असत ,

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,

मैतिनिला ग्रुप मधे कायम defend करायच असत ,
मैतिनिला ग्रुप मधे कायम defend करायच असत ,

आणि कधी तरी कैंटीन मधेच lecture attend करायच असत ,

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,

आमच्यात इस्सुएस न कधी नाही एंड ,
आणि तर आहोत फ़क्त बेस्ट फ्रेंड अस म्हनायच असत ,

तिचा पाहण्यासाठी मागुन स्लो स्लो चालायच असत
आणि bike नसली म्हणून के जाल, साइकिल वरुण फोल्लो करायच असत,

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,


12th ला २ मार्क कमी मिळाले म्हणून radayach असत ,
आणि इंजीनियरिंग ला , साला पास तर जालो म्हणून मन मुराद हसयाच असत ,

मित्र आजारी पडल्यावर त्याची केयर करायच असत ,
आणि होटल मधे जावीं बिल मात्र शेयर करायच असत

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,

आपणही कधीतरी डिसेंट रहताच असत ,
आणि मुलिसमोर कधीतरी एक्सेंट मारायच असत...

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत

आता बन्धनात नाही adakanar अस म्हनायच असत ,
आणि येता जाता प्रत्येक चेहर्याच्या प्रेमात पाडायच असत ..

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत ,
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत

सगल जग फिरुनाही , पन्हाल्यासथी ज़ुरयाच असत ,
आणि
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत

मागल्या चूका आठवून कधी तरी उदयाच दर थोठावायाचा असत
जीवनात कधीतरी स्वतालाही माफ़ करायच असत ,

मित्रा जीवन हे असाच जगायच असत..

मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत
मित्रा जीवनात कधीतरी वेड्यागत वागायच असत

एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके

माझ्या आठवणीतले काही निवडक क्षण , परत जगण्याच्या उर्मीने आठवलेले
कवितेच नाव आहे एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके .

एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके

चल मित्रा एकवार परत फिरू ,
आणि हरवलेले ते क्षण जमा करू...

contri काढून केलेली ती पार्टी,
नाक्यावर बसलेली ती कार्टी,
GT साठी पावरलेले ते light
आणि PL च्या नावावर जागवलेल्या nights

सार काही परत जगू
आणि एकदा तरी तिथे परत फिरू

जुन्या मायेला होवू नाही पारखे ,
हरवलेले क्षण सगळे वेचू सारखे,
साथीला दे फक्त , साथीला दे फक्त ,

एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके
एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके....

assignment आणि प्राक्टिकॅल चा सुरु करू पुन्हा खेळ,
साथी असेल चौकातली तीच ओली भेल,
तिथे असेल आपल्याकडे जगातला सगळाच वेळ,
म्हणूनच म्हणतो चल होवुया एखाद्या विषयात फेल ...

सार काही परत जगू
आणि एकदा तरी तिथे परत फिरू

जुन्या मायेला होवू नाही पारखे ,
हरवलेले क्षण सगळे वेचू सारखे,
साथीला दे फक्त , साथीला दे फक्त ,

एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके
एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके....


मेस बंद म्हणून बाहेर जेवायला जावू,
प्राची आनंद करता करता जयारत्न मध्ये खावू ,
butter चीकेन बरोबर ,मालवणी रस्सा पिवू ,
क्रिकेट match वर परत पैज लावू ...


चलना,
सार काही परत जगू
आणि एकदा तरी तिथे परत फिरू


जुन्या मायेला होवू नाही पारखे ,
हरवलेले क्षण सगळे वेचू सारखे,
साथीला दे फक्त , साथीला दे फक्त ,

एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके
एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके....

महलक्ष्मि चे दर्शन , जोतिबाचा डोंगर परत चढू सारे ,
पन्हाळ्याचे अनुभवूया थंडगार वारे ,
रंकाळ्यावर चल भटकायला जावू ,
परत एकदा सुरेखा पुनेकारचा तमाशा पाहू

वारणेच्या वातावरणात होवू तल्लीन सारे ,
terrace वर पडून मोजू अंगणातील तारे ,

white house वर घडू दे परत चर्चांचा फेर
मान्गुसुले वर चालू दे NFS चा खेळ

चलना,
सार काही परत जगू
आणि एकदा तरी तिथे परत फिरू


जुन्या मायेला होवू नाही पारखे ,
हरवलेले क्षण सगळे वेचू सारखे,
साथीला दे फक्त , साथीला दे फक्त ,

एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके
एक उनाड दिवस आणि मित्रांचे टोळके....


-प्रवीण

Wednesday 10 October 2012

दिवस थोडे मागे जावेत

                                                  दिवस थोडे मागे जावेत
वाटत आयुष्यात  थोडं  मागे जावं
तुझे माझे सारे क्षण परत जगून पहाव  ...

आता वाटत सगळ परत पहिल्यासारखं व्हाव ...
आपण दोघं पुन्हा प्रेमात पडाव..

लोनसर बोट तुझी पुन्हा माझ्या हातात घ्यावी ..
नशिल्या डोळ्यांची तुझ्या पुन्हा मदिरा प्यावी ..

आता वाटत ...
वाटत आयुष्यात  थोडे मागे जावं
तुझे माझे सारे क्षण परत जगून पहाव  ..

पुन्हा एकदा भेटायचं आहे तुला चोरून ..
पुन्हा तुला घेवून जायचं आहे निर्जन स्थळी सायकलची दौड मारून..

पुन्हा हातातल्या ब्रेसलेटशी करायचा आहे चाळा ..
केसात पुन्हा माळ्याच्या आहेत त्या  मोगऱ्याच्या  माळा .....

राहून राहून वाटत .......
वाटत आयुष्यात  थोडे मागे जावं
तुझे माझे सारे क्षण परत जगून पहाव  ..

पुन्हा एकदा झेलायचे आहे गालावरून ओघळणारे आसू ..
पुन्हा पाहायचं आहे तुझ्या मुखातले हसू ...

तुझ्यासाठी परत एकदा व्हायचं आहे  वेड ..
तुझ्यावर लटकेच रागवायचं आहे थोडं ..

आता वाटत ...
वाटत आयुष्यात  थोडे मागे जावं
तुझे माझे सारे क्षण परत जगून पहाव  ..


वाटत .......

-प्रवीण

Friday 14 September 2012


Hi All,
I am writing this to express my feeling about my mother, perhaps I can share what I feel about her. Its extremely sad to say that we receive 100 of sms on the valentine day, friendship day but not a single sms on the Mothers day (Yes not a single sms). May be we become to busy in our own that we are not acknowledging the eforts she has put in growing you.


I am feeling my life incomplete without my mother , everything seams to be meaningless without her. I lost my mother almost 2 years back. It was a major shock to all of us, we never expected to live our life without her. My mother has toched every part of life in such a way that it took great efforts for us to adjust on our day to day life.

she was gereatest source of inspiration for me , motivating me always to exle in whatever thing I do in life. Its because of her discipline I may able to come this far and. always think ten times before doing anything as what my mother (Aai ) would thought of me
Even if she is not with me , but I know ahe is there somewhere watching me .

There are some very true line written about mother in marathi which totally reveals the greatness of mother……..

प्रत्येकाच्या मनात आईची एक निराळीच जागा असते नाही ! आपल्या आयुष्यात एकटं वाटावं असे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा हक्काची आई आहेच हे पुरतं माहीत असतं. ती म्हणाली "सगळ ठीक होईल'', की सगळं ठीक होणार असं वाटू लागतं...नव्हे तसं ते होतंच.


Very true isnt it, the greatest of Guru of ours….. The beloved friend and the true mentor..

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी
औषधावर दिलेली लिमलेटची गोळी
आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा
शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा
आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात
मेतकूट कालवलेला मऊ तूपभात
आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र
सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र


I still remember the day when I got selected in Infosys how happy she was , when I called and give her the news.
Her immediate question after that is "tu punyatach rahanar na re bala?" so inocent she is.


आई, मला तुझी खुप आठवण येते. Aai Tuze Upkar Anant
Cant write more…

Fakt Tuzach

pavu

दिवस निघून जातात

तू गेल्यावर जीवन झालंय निरस...

अजून आठवतात तुझ्याबारोबरचे मंतरलेले दिवस ...



हसता , खेळत असताना भांडणाचा तुझा स्वभाव जुना ..

आवडत होत्या त्या डोळ्यातल्या खाना-खुणा ...



तुझ मन नेहमीच गुलाबावर बसलेलं ..

आणि कॅडबरी + आईस - क्रीमच गणित मला मलाही जमलेलं



त्यानंतरचा नाकावरचा राग किती फसवा असायचा ..

तुझा होकार मला माझ्या डोळ्यात दिसायचा ....



किती अलगद मिठीत विरून जायचीस ..

निरोप देताना प्रत्येक वळणावर मागे वळून पहायाचीस ..



आता किती दिवस तुझ्या आठवणीत रमायचं ..

किती वेळ किनार्यावरच्या वळून आपले नाव शोधयाचे ..



चालता चालता आसमंतात कोलोख दाटलेला ..

पण माझ्या मनात मात्र आशेचा नवीन दीप पेटलेला ..



तुझ्या जाण्यातून आता सावरतोय ..

अंगणातला मोगराही आता मोहरतोय..



जुन्या आठवणीत मने भिजून जातात ..

दिवस कसेही असले तरी निघून जातात ...