Wednesday 13 April 2011

प्रेमाचा विकार

प्रेमाचा विकार
तारुण्याच्या लाटेवर होवून स्वार,
बांधा कमनीय शेलाटी नार ,
असे मृगनयन डोळे पाणीदार ,
ओठ गुलाबी , मान सुरायीदार ,
गाल चंदेरी कुरळा केशसंभार ...

३६-२४-२६ चा शिरीराचा आकार ,
कोण्या कवीच्या प्रेमाचा हुंकार ...
भक्ताच्या मनातला देवाचा ओंकार ,
बन माझ्या जीवनाचा आधार ,


पोरी नको करू दिलाला बेजार ,
चाल ठुमकत वाकू नको फार ,
भेटशील का एकांतात एकवार ..
सांग आणू bike कि मेर्सिदेस कार ..

असे नाही म्हणणार कितीवार ,
ठरवू भेटायची वेळ रविवार दुपारचे चार ,
भेटून गिरवू प्रेमाचे सगळे प्रकार ,
नाही म्हणून देवू नको माझ्या हृदयाला विकार .

सोडून दे जगाचे बंधन आणि शिष्टाचार ,
कशाला पाहिजे पैसे आणि त्याचा गुणाकार ,
मीच तुझा इंग्लंडचा राजा आणि रशिअन झार ,
माझी तू अर्धागिनी आणि मी तुझा भ्रतार ,
दोघे मिळून करूया प्रेमाचे स्वप्न साकार ..


भेटली होती अशी एक ,
तारुण्याच्या लाटेवर होवून स्वार,
बांधा कमनीय शेलाटी नार ,


-प्रवीण

Saturday 9 April 2011

सांजवेळेची आठवण

सांजवेळेची आठवण

फुलपाखराप्रमाणे दिन उडून जातात अस म्हटलंय कोणी ,
जाणारया प्रत्येक दिवसाबरोबर धूसर होतायेत तुझ्या आठवणी ..

अजूनही मनात ताजी आहे ती मिठी आणि कानामागाचे उष्ण श्वाश ,
अजूनही उरात भरून उरलाय रातराणीचा तो सुवास ....

दिवस निघून जातो , पण सांज मात्र रेंगाळते ..
आठवणीचे प्रत्येक क्षण इंद्रधनू होऊन ओघळते ...

सांजवेळी , तुझ्या आठवणीने शांत होत , दिवसभर भिरभिरणारे मन ..
आणि आठवत नाही , तुला न आठवणारा एकही क्षण ..

सांज वेळ जावून मग रात्रीशी भेट घडते ..
स्वप्नात येते तेच आंगण आणि तू बांधलेले दोघांचे घरटे ..

तुझ्याच आठवणीत रात्रभर जागा राहतो ..
मग पहाटेचा सूर्यच माझ्याकडे हसून पाहतो ..

समोर असतो अंगणात पडलेला मोगऱ्या बरोबरोबाराचा आठवणीचा सडा ...
कुठे तरी दूर कोकिला गात असते ,तूच शिकवलेला प्रेमाचा पाढा ..

आशा करतो नव्या जीवनात सुखी असशील ,
पण मन म्हणत मनातून दुखी असशील ..

आजकाल , दिवस निघून जातो , आणि मग सांज पुढे येते ,
आणि मग तुझ्या आठवणीने मन मात्र वेडे होते...

साद देते , किनाऱ्यावरची सांज वेळ आणि मंद हवा ,
रोजच्या प्रमाणे चालू होतो मग प्रेमाचा अध्याय नवा ..

कधीतरी वेळ जातो मित्रांबरोबर छान,
आता पत्यात हि मिळत नाही बदामाचे पान..

आजकाल , दिवस आणि रात्रीशी बसत नाही मेळ,
प्रेमाच्या गावी घेवून जाते , तुझी आठवण आणि सांज वेळ .....

- प्रवीण

Thursday 7 April 2011

पहिला पाऊस आणि पहिले प्रेम

पहिला पाऊस आणि पहिले प्रेम
पहिला पाऊस पहिले प्रेम ,
पहिल्या सरीचे पहिले थेंब ..

मुसळधार धारा आणि कोसळणारा पाऊस ..
त्यात भिजण्याची त्याची हौस ...

(तिला पाऊस आवडत नाही .. पण त्याला पाऊस आवडतो..तीचे आणि त्याचे संभाषण खाली)
पाऊस म्हणजे चिखल , पाऊस म्हणजे ओली माती.
सखे ह्या पावसातच जुळतात जन्मा-जन्माच्या गाठी ,

पाऊस म्हणजे वाफाळलेला चहा , पाऊस म्हणजे गरम कांदा भजी...
राणी ह्यांच्या प्रमाणेच असुदे प्रीत तुझी अन माझी...

पाऊस म्हणजे थंडगार वारा , पाऊस म्हणजे सर्दी ..
पाऊस म्हणजे प्रेमाच्या धारा , पाऊस म्हणजे प्रेमाची वर्दी ..

(ती चिडते आणि म्हणते )
माझ्या आणि पावसा मध्ये कोणाला पसंत करशील ,
सखे वाटलं नव्हत ,अस विचारून माझ्या हृदयाची शकल करशील ..

मला तर पाऊसच प्रिय वाटतो ..
आणि त्याच्या थेंबा मधून तुझाच चेहरा वाहतो ..

कापसाच्या पिंजर्यातला काळाकुट ढग ..
तुझ्या गोऱ्या गालावरची जणू केसांची बट..

पावसानी भरलेले नभ ओले ओले ,
माझ्याच प्रतीबिम्बात बुडलेले तुझे निळेशार डोळे

.कुठूनशी येणारी कडाडणारी वीज ,
पण तुझ्या स्मित हास्याचे तिला नाही चीज .

म्हणूनच म्हणतो , तुझ्या पेक्षा पाऊस मला प्रिय वाटतो ,
आणि त्याला पाहिल्यावर मला तुझाच चेहरा स्मरतो ..

चल सोडून सारी लाज ,
दुनियेचा राखू नको बाज ,
कशाला काम आणि कशाला काज ..
चल पावसात बेभान नाचूया आज ..

नको .. मला पावसाची भीती वाटते .
.कडाडणारी वीज किती खरी वाटते ..

चल भिवू नको...बाहेर मी पावसालाच भिजताना पाहिलाय ..
आपल्या सारखीच तोही छत्री विसरलाय ....

म्हणूनच पाऊस मला तुझ्याहून प्रिय वाटतो ..
त्याला पाहिल्यावर , त्यात मला तुझाच चेहरा स्मरतो...

चल मनातल्या मनात माझ्या , आठवणीच्या गावी जावू ..
आणि तुझे माझे सारेच पावसाळे परत भिजून पाहू...

पाऊस आल्यावर एखादी अशी कविता स्मरते ..
आणि जगण्याला तुझी एकच आठवण पुरते ..

-प्रवीण